Search our sites

Search past winners/finalists


  • MESA logo
  • SATE logo

मराठी (marāṭhī)

IBA Montage

आम्ही 2025 (22 व्या वार्षिक) स्टीव्ही पुरस्कारांमध्ये 'वुमेन इन बिझिनेस' श्रेणीसाठी नामित होण्यासाठी आपल्या संस्थेस आमंत्रित करतो. आंतरराष्ट्रीय व्यापार पुरस्कार आणि अमेरिकन बिझिनेस अवॉर्ड्सच्या निर्मात्यांनी व्यवसायाशी संबंधित जगातील एक प्रमुख पुरस्कार समारंभ, विशेषकरुन स्त्रियांसाठी आयोजित केले आहेत.

आपले नामांकन देण्यासाठी लागणारी माहिती आणि सूचना असलेली पुस्तिका तसेच प्रवेशिका आपल्याला हवी असल्यास आपला ई-मेल आम्हास पाठवावा. त्यावर ही प्रवेशिका पाठवण्यात येईल. आम्ही माहितीची गोपनीयता काटेकोरपणे पाळतो. आपला ई-मेल कोणत्याही कारणास्तव दुसर्‍यांना दिला जाणार नाही.

 

या वेबसाइट वरील इथे असलेला मजकूर फक्त या भाषेतील आहे. इतर पानांवरील तसेच पुस्तिकेतील मजकूर हा इंग्रजी भाषेत आहे. नामांकनाची प्रक्रिया इंग्रजी भाषेत असणे गरजेचे आहे, कारण यामुळे जगभरातील व्यावसायिकांना निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल.

व्यवसायातील महिलांसाठीच्या स्टिवी पुरस्कारांविषयी

जगभरातील महिला उद्योजक, अधिकारी, कर्मचारी आणि त्या चालवत असलेल्या संस्था यांच्या कामगिरीचा सन्मान व्यवसायातील महिलांसाठीच्या स्टिव्ही पुरस्काराद्वारे केला जातो. स्टिवी पुरस्कार संस्था, जी पुरस्कार प्रदान करते, ही अमेरिकेत आहे. आम्ही आठ विविध स्टीवी अवॉर्ड स्पर्धांचे आयोजन करतो. याविषयीची माहिती  www.StevieAwards.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्टिवी पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठीत पारितोषिकांपैकी एक असा ठरला आहे.

2024 मध्ये महिला उद्योजकांसाठीचा स्टीव्ही पुरस्कार 30 पेक्षा जास्त देशांमधील संस्था आणि व्यक्तींना प्रदान करण्यात आला.. 2024 मधील विजेत्यांची यादी याठिकाणी पाहा.

पुरस्कार विभाग

महिला व्यावसायिकांसाठीचे स्टिवी पुरस्कार विविध श्रेणी किंवा विभागात उपलब्ध आहेत. जर तुम्ही यात सहभागी होण्याचे ठरविले तर, तुमच्या संस्थेच्या कोणत्या प्रकारच्या कामगिरीची दखल घेतली जावी असे तुम्हाला वाटते, त्याप्रमाणे तुम्ही श्रेणी किंवा विभाग निवडावा. ती श्रेणी किंवा तो विभाग निवडल्यावर त्याच्या नामांकनासाठी लागणार्‍या सूचना पाळून तयारी करावी. खालील श्रेणी किंवा विभाग निवडीसाठी उपलब्ध आहेत.

  • वैयक्तिक महिला पुरस्कार विभागात खालील पर्याय  
    • वर्षभरातील महिला उद्योजक
    • वर्षभरातील नवकल्पना मांडणारी महिला
    • वर्षभरातील महिला अधिकारी
    • वर्षभरातील महिला कर्मचारी
  • कंपनी/संस्था (महिला मालकीच्या / नेतृत्व असलेल्या) पुरस्कार विभाग
  • नवीन उत्पादन आणि सेवा ( महिलांसाठी / महिलांनी तयार केलेले ) पुरस्कार विभाग
  • संपर्क आणि विपणन ( महिलांसाठी / महिलांनी तयार केलेले ) पुरस्कार विभाग
  • माध्यम ( महिलांसाठी / महिलांनी तयार केलेले ) पुरस्कार विभाग
  • मोठ्या कामगिरीबद्दलचे विभाग

श्रेणी किंवा विभागांची यादी आणि त्यासंबंधीची माहिती, प्रत्येक श्रेणीसाठी प्रवेशाबद्दल लागणार्‍या आवश्यक गोष्टी, अंतिम तारिख आणि लागणारे प्रवेश शुल्क या सगळ्यांचा उल्लेख प्रवेशिका पुस्तिकेत असणार आहे.

 

पुरस्कार

महिला उद्योजकांसाठी 2025 स्टीव्ही पुरस्कारांची अंतिम घोषणा 19 सप्टेंबर रोजी होईल. न्यूयॉर्क शहरातील एका भव्य समारंभात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाईल. स्टीव्ही पुरस्कार प्राप्तकर्त्यांना समारंभात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्रदान केली जातील.

संपर्क

महिला व्यावसायिक स्टिवी पुरस्काराविषयी किंवा इतर स्टिवी पुरस्कार कार्यक्रमाविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरुर पाठवा.

The Stevie Awards
10560 Main Street, Suite 519
Fairfax, Virginia 22030, USA
Phone: +1 703-547-8389
Fax: +1 703-991-2397
Email: help@stevieawards.com