मराठी (marāṭhī)
आम्ही तुमच्या संस्थेला 2024 (21 वा वार्षिक) इंटरनॅशनल बिझनेस अवॉर्ड्स®, जगभरातील प्रमुख व्यवसाय पुरस्कार कार्यक्रमासाठी नामांकन सादर करण्यासाठी आमंत्रित करतो.
आपले नामांकन देण्यासाठी लागणारी माहिती आणि सूचना असलेली पुस्तिका तसेच प्रवेशिका आपल्याला हवी असल्यास आपला ई-मेल आम्हास पाठवावा. त्यावर ही प्रवेशिका पाठवण्यात येईल. आम्ही माहितीची गोपनीयता काटेकोरपणे पाळतो. आपला ई-मेल कोणत्याही कारणास्तव दुसर्यांना दिला जाणार नाही.
या वेबसाइट वरील इथे असलेला मजकूर फक्त या भाषेतील आहे. इतर पानांवरील तसेच पुस्तिकेतील मजकूर हा इंग्रजी भाषेत आहे. नामांकनाची प्रक्रिया इंग्रजी भाषेत असणे गरजेचे आहे, कारण यामुळे जगभरातील व्यावसायिकांना निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल.
कामाच्या ठिकाणी विविध पैलूंच्या कामगिरीची दखल घेणारा कार्यक्रम असा हा ’आंतरराष्ट्रीय व्यापार पुरस्कार’ जगभरात प्रसिध्द आहे. या पुरस्कारांचे वितरण अमेरिकास्थित ’दी स्टीवी अवॉर्ड ऑर्गनायझेशन’ तर्फे होते. आम्ही आठ विविध स्टीवी अवॉर्ड स्पर्धांचे आयोजन करतो. याविषयीची माहिती www.StevieAwards.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्टिवी पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठीत पारितोषिकांपैकी एक असा ठरला आहे.
2023 मध्ये, ५० हून अधिक देशांतील संस्था आणि व्यक्तींना आंतरराष्ट्रीय स्टिव्ही पुरस्कार दिले गेले. 2023 आवृत्तीमधील विजेत्यांची सूचि पहाण्यासाठी इथे क्लिक करा.
आंतरराष्ट्रीय व्यापार पुरस्कार पटकावण्यासाठी विविध श्रेणी किंवा विभाग उपलब्ध आहेत. जर तुम्ही यात सहभागी होण्याचे ठरविले तर, तुमच्या संस्थेच्या कोणत्या प्रकारच्या कामगिरीची दखल घेतली जावी असे तुम्हाला वाटते, त्याप्रमाणे तुम्ही श्रेणी किंवा विभाग निवडावा. ती श्रेणी किंवा तो विभाग निवडल्यावर त्याच्या नामांकनासाठी लागणार्या सूचना पाळून तयारी करावी. खालील श्रेणी किंवा विभाग निवडीसाठी उपलब्ध आहेत.
- वर्षातील उत्कृष्ट कंपनी पुरस्कार
- जनसंपर्क पुरस्कार
- ग्राहक सेवा पुरस्कार
- मानव संसाधन पुरस्कार
- माहिती तंत्रज्ञान पुरस्कार
- व्यवस्थापन पुरस्कार
- विपणन पुरस्कार
- वेब पुरस्कार, वार्षिक अहवाल पुरस्कार, प्रसंगानुरुप पुरस्कार आणि व्हिडीओ पुरस्कार यांच्या समावेशासहीत सर्व प्रकारची माध्यमं.
- व्यावसायिक कामगिरी पुरस्कार
- नवीन उत्पादन पुरस्कार
श्रेणी किंवा विभागांची यादी आणि त्यासंबंधीची माहिती, प्रत्येक श्रेणीसाठी प्रवेशाबद्दल लागणार्या आवश्यक गोष्टी, अंतिम तारिख आणि लागणारे प्रवेश शुल्क या सगळ्यांची उल्लेख प्रवेशिका पुस्तिकेत असणार आहे.
बहुतेक सर्वच श्रेणीत आपल्या अथवा आपल्या संस्थेच्या, आपण निवडलेल्या श्रेणीतील कामगिरीचे पाच (५) मिनीटांचे चलचित्र बनवुन प्रस्तुत केले जाऊ शकते किंवा आपण आपल्या श्रेणीतील प्रश्र्नांची लिखित उत्तरेही देऊ शकता.
2024 आंतरराष्ट्रीय स्टीव्ही पुरस्कार विजेत्यांची घोषणा 14 ऑगस्ट रोजी केली जाईल. स्टीव्ही पुरस्कार ट्रॉफी आणि रौप्य आणि कांस्य पदके नंतर ऑक्टोबरमध्ये युरोपमधील समारंभात प्रदान केली जातील.
आंतरराष्ट्रीय व्यापार पुरस्काराविषयी किंवा इतर स्टिवी पुरस्कार कार्यक्रमाविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरुर पाठवा.
The Stevie Awards
10560 Main Street, Suite 519
Fairfax, Virginia 22030, USA
Phone: +1 703-547-8389
Fax: +1 703-991-2397
Email: help@stevieawards.com